Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Kagadpatre | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे आणी माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे आणी माहिती
मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून राज्यातील महिलांना या ठिकाणी १५०० रु पंधराशे रुपये देण्याचा निर्णय या योजनेतून घेण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार ? त्यासाठी आवश्यक पात्रता काय असणार ? कागदपत्रे अर्ज कसा करायचा आहे यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Kagadpatre | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे आणी माहिती
काय आहे ही योजना ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात 28 जून रोजी सुरू करण्यात आली आहे या योजनेचे अंमलबजावणी १ जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा १५०० रु पंधराशे रुपये मिळण्याची ही योजना आहे.
योजनेचा उद्देश:
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
- त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे स्वरूप :
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे लाभार्थी पात्रता:
- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 यावर्षी वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला
- योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे
- राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परीक्षा आणि निराधार महिला
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षांपूर्वीपर्यंत
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५ लाख हून जास्त नसावे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही ?
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपया 2.5०००० अडीच लाख होऊन जास्त आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहे म्हणजेच टॅक्स भरत आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत केव्हा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा महिला यासाठी पात्र नसतील
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहने यामध्ये ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत
सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल
सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे
- बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानांची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशन कार्ड
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज करण्याची पद्धती How to Apply:-
- योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात यासाठी पुढील प्रक्रिया विविध केलेली आहे
- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल
- ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांमध्ये यामध्ये नागरिक /ग्रामीण /आदिवासी/ ग्रामपंचायत /वार्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील
- वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्पाधिकारी कार्यालय यामध्ये नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल
- अर्ज करणे भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल
- अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ही केवायसी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती अन्य आवश्यक आहे यामध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड
सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव वावर हीच पॉवर !
तात्पुरत्या यादीचे प्रकाशन:
अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्परती यादी पोर्टलवर किंवा ॲप वर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल
आक्षेपची/harakat/हरकत:
जाहीर यादीवरील हरकत पोर्टल किंवा ऍप द्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाइन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टर मध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठित करण्यात येईल
यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन होईल
तात्पुरती निवड यादी 16 जुलै 2024 रोजी लावली जाणार आहे तर अंतिम यादी या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024 रोजी लागण्यात येणार आहे
महत्वाच्या तारखा तक्ता / Important Dates:
अधिकृत GR शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click Here
THANK YOU
TEAM SARKARNITI
जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇
आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी👇
🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/
🙋🏻♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻♂️📲🪀