वावर हीच पॉवर ! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव
भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यांत सुविधा सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावा नंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.त्यामुळे १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे. त्यासंदर्भात संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरु आहे.
येणाऱ्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला, त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, दि १ मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्याला सुमारे तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
विवाहित स्त्रियांबाबत काय आहे पद्धत ?
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहा नंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. •
महिलेला विवाह पूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजा मध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील
नवीन नियमानुसार महिलेल नवीन घेतलेली मालमत्ता आपल्या विवाहपूर्वीच्या नावाने नोंदवण्याचा अधिकार सरकारने दिला आहे यामुळे महिला सबलीकरणाला चालना मिळणार आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती मध्ये महिलांना समानतेचा अधिकार देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि हा फार महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे या बदलाचे सर्व स्तरातून स्वागतच होणार आहे तरी आपले मत कमेंट बॉक्समध्ये लिहा.
सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव
Monsoon Update 2024 | राज्यात यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज येथे वाचा
काय म्हणाल्या सरिता नरके मॅडम नवीन नियमाबाबत
१ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाद्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील. १ मे पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत नोंद होणार नाही. :-
सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई-फेरफार प्रकल्प
वावर हीच पॉवर ! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव
1 मे पूर्वी जन्मलेल्या नातेवाईकांना जर नवीन नियमानुसार आईचे नाव नोंदवायचे असेल तर कोणते पुरावे द्यावे लागतील?
सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव
- येत्या सहा महिन्यांत जुन्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीना ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
- त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे.
- त्यासंदभर्भातील आवस्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची गाव तलाठ्या मार्फत सहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी
आपला अभिप्राय कळवा धन्यवाद ताज्या बातम्या आणि शासन निर्णय यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा…
Thank You
Team SarkarNiti
जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇
आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी👇
🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/
🙋🏻♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻♂️📲🪀