Monsoon Update 2024
Monsoon Update 2024 राज्यात ‘ या ’भागात मान्सूनची अधिक शक्यता
आयएमडी चा सुधारित अंदाज जाहीर
राज्यात यंदा मान्सून दमदार सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाने एमआयडी ने आज जाहीर केला या हवामान अंदाज आत सर्वसाधारण 4% टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आलेली आहे. राज्यात यंदा मान्सून दमदार सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
Monsoon Update 2024
देशात जून महिन्यात पावसाची शक्यता
देशात जून महिन्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे या नव्या अंदाजामुळे कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंदाजा प्रमाणे चार टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात म्हणजेच मान्सून कोरझोन मध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्रज्ञ विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी मान्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज आज जाहीर केला, हवामान विभागाने 15 एप्रिल रोजी केली जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाज आतील देशभरात 106% पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती 1971 ते 1920 कालावधी देशाची मान्सून पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर म्हणजेच 868.6 मिलिमीटर आहे तर सरासरीच्या 96 ते 104% पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
IPL 2024 Awards | IPL चे महत्त्वाचे रेकॉर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
सुधारित अंदाजानुसार मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (32 %) बत्तीस टक्के तर दुष्काळाची शक्यता अवघी 2% असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा मान्सून हंगामात देशात पावसाचे वितरण चांगले राहण्याची शक्यता आहे प्रमुख विभागणी या पावसाचे वितरण लक्षात घेता येईल ईशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारतात उतरेकडील भाग पूर्व भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
Monsoon Update 2024
मान्सूनच्या मध्यावर ला निना स्थिती शक्य
विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती वेगाने निवळत आहे. समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीवर येत आहे जागतिक हवामान प्रारूपानुसार मान्सून हंगामाच्या सुरुवातीला सामान्य होणार असून जुलै महिन्याच्या अखेरीस ला निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत, ला निना स्थिती मान्सूनच्या पावसाला पोषक समजली जाते.
हवामान विभागणीय पावसाचा अंदाज तक्ता
विभाग आणि अंदाज तक्ता
विभाग | अंदाज |
वायव्य भारत | 92.108% |
मध्य भारत | 106% पेक्षा अधिक |
दक्षिण भारत | 106% पेक्षा अधिक |
ईशान्य भारत | 94% |
Monsoon Update 2024
जून महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता
जून महिन्यात देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा 92 ते 100% अंदाज हवामान विभागाने वर्तव्य आहे दक्षिण द्वीपकल्प मध्य भारतासह वायू आणि ईशान्य भारताचा काही भाग भागात रासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या बहुतांशी भागात सरासरी पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात मान्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो यातून जून महिन्यात दक्षिण भारत वगळता देशांच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्यात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक मान्सून
मान्सूनच्या काळात महाराष्ट्रात यंदा दमदार पावसाचे संकेत आहेत महाराष्ट्र सह मान्सून कोरझोन मध्ये सरासरीपेक्षा 106% टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे .हंगामात महाराष्ट्र पावसाचे वितरण सर्वदूर चांगले राहणार असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे यातच मराठवाडा आणि लगतच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जून महिन्यातील उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग वळता बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Monsoon Update 2024
IMD अधीकृत वेबसाईट यथे क्लिक करा
आयएमडी चे अधीकृत PDF पाहण्या साठी यथे क्लिक करा
Thank You
Team SarkarNiti
जॉब आणि शैक्षणिक अपडेट तसेच शेती योजना साठी आमच्या 🪀Whatsapp ग्रुपला join व्हा 🚨 👇
आमचं इन्स्टाग्राम Instagram पेज पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
🌐 अधिक माहिती साठी वेबसाईट🌐👇
https://sarkarniti.com/
🙋🏻♂️ ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻♂️📲🪀
1 thought on “Monsoon Update 2024 | राज्यात यंदा मान्सून दमदार सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज”